बांग्लादेशचा 58 रन्समध्ये खुर्दा

March 4, 2011 1:14 PM0 commentsViews:

04 मार्च

वेस्ट इंडिजच्या भेदक बॉलिंगचा तडाखा आज बांगलादेशला सहन करावा लागला. दुबळ्या नेदरलँडला 115 रन्समध्ये गुंडाळणार्‍या विंडिजनं यजमान बांगलादेशचा 58 रन्समध्येच खुर्दा उडवला. आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा निचांक नोंदवला गेला. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दरम्यान आज मिरपुरच्या शेर ए बांगलादेशवर मॅच रंगली आणि पहिली बॅटिंग करणार्‍या बांगलादेशची टीम अवघ्या 58 रन्सवर ऑलआऊट झाली. त्यांची इनिंग अवघ्या 18 पूर्णांक 5 ओव्हरमध्ये संपुष्टातआली. मॅचच्या पहिल्यात ओव्हरमध्ये ओपनर तामिम इक्बाल शुन्यावर आऊट झाला. आणि यानंतर ठराविक रन्सच्या अंतरानं बांगलादेशचे बॅट्समन आऊट झाले. बांगलादेशचा हायेस्ट स्कोर होता 25 रन्स. जुनैद सिद्दीकीनं 25 तर अश्रफुलनं 11 रन्स केले. पण इतर तब्बल 8 बॅट्समनना रन्सचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. वेस्ट इंडिजतर्फे सुलेमान बेननं सर्वाधिक 4 तर केमार रोच आणि डेरेन सॅमीनं प्रत्येक 3 विकेट घेतल्या.

close