सातार्‍यात रुग्णालय आणि मेडिकल सेवा बंद

March 4, 2011 1:45 PM0 commentsViews: 3

04 मार्च

सातारा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि मेडिकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 2 दिवसापूर्वी सातार्‍यातील चिरायु चिल्ड्रन ऍण्ड रिसर्च हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती. या हॉस्पिटलमध्ये 9 महिन्याच्या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेने चिडलेल्या नातेवाईकांनी आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली होती. याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सातारा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर संबंधित तोडफोड करणार्‍यांवर अटकेची कार्यवाही करण्यात आली. अटक केलेल्यांना जिल्हा न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी दिली .मात्र पोलीस या घटनेची योग्य माहिती न्यायालयाला देत नसल्याचं जिल्ह्यातील डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यांच्या विरोधात त्यांनी 1 दिवसाचा लक्षणीय बंद पुकारला. यात जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल आणि मेडिकल सेवा बंद ठेवण्यात आली.

close