पुणेकरांसाठी लवकरचं फुलपाखरु उद्यान

March 4, 2011 1:31 PM0 commentsViews: 41

04 मार्च

सुंदर रंगीबेरंगी हजारो फुलपाखरं एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. कारण पुण्यामध्ये पॅपीलॉन नावाचे भारतातील दुसरे फुलपाखरु उद्यान उभे राहत आहे. पुण्यातल्या सहकारनगर परिसरात 30 हजार स्क्वेअर फुट जागेवर हे फुलपाखरु उद्यान सुरु करण्यात येणार आहे. येत्या 8 तारखेला अभिनेत्री डींपल कपाडिया आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होणार आहे.

या फुलपाखरु उद्यानात विविध जातींची सुमारे 10 हजारांपेक्षा अधिक फुलपाखरं एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. यामध्ये फुलपाखरांच्या जवळपास दिडशे जाती आहेत. तसेच या ठिकाणी फुलपाखरांना अंड्यापासून अळी आणि फुलपाखरु होईपर्यंत संरक्षण देण्यासाटी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फुलपाखरांना नैसर्गीकरित्या राहता यावं यासाठी खास वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे.

close