आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इंटर्नशिपवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार

March 4, 2011 3:16 PM0 commentsViews: 6

04 मार्च

राज्यभरातल्या आयुर्वेदिक विषयाच्या विद्यार्थ्यांनी उद्यापासून सुरू होणार्‍या इंटर्नशिपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं इंटर्नशिपचा जुना पॅटर्न बदलला आहे. पूर्वीच्या पॅटर्ननुसार कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये 6 महिने, कॅज्युअल्टीमध्ये तीन महिने आणि ग्रामीण रुग्णालयात 3 महिने अशी इंटर्नशिप होती. पण आता कॉलेजच्या हॉस्पिटलमधल्या इंटर्नशिपचा कालावधी सहावरुन 9 महिने करण्यात आली. आणि इमर्जन्सी वॉर्डमधली इंटर्नशिप रद्द करण्यात आली. या नव्या पॅटर्नमुळे इमर्जन्सी पेशंटस् हाताळण्याचा अनुभव मिळणार नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे हा पॅटर्न बदलून जुनाच पॅटर्न लागू करावा ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर मोर्चा सुद्धा काढला.

close