कोल्हापुरी गुळाची गोडी जगभर पसरणार

March 4, 2011 3:27 PM0 commentsViews: 71

प्रताप नाईक, कोल्हापूर

04 मार्च

कोल्हापुरी गुळाची गोडी आता जगभर जाणार आहे.आपल्या वैशिष्टपूर्ण चवीमुळे आणि रंगामुळे प्रथम क्रमांकाचा समाजला जाणार्‍या गुळाचे जिओग्राफीकल इंडिकेशन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत.त्यामुळे कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून बनावट गुळ विकणार्‍यांना चाप लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गुळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी 350 कोटीची उलाढाल होते.त्याचबरोबर या व्यवसायावर दिड लाखांहुन अधिक लोकांची उपजिविका चालते.वर्षाकाठी तयार होणार्‍या 8 ते 9 लाख क्विंटलपैकी 80 टक्के गुळ परराज्यात जातो. पण या गुळाला कोणतेही कायदेशीर सरंक्षण नाही.याचाच फायदा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही शहरातील व्यापारी घेतात.त्यामुळे कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न समितीनं कोल्हापूरचं वैशिष्टे असलेल्या गुळाचे जिओग्राफीकल इंडिकेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला.

जिओग्राफीकल इंडिकेशन करुन घेतल्यामुळे कोल्हापुरी गुळाचं लेबल लावून बनावटगिरी करणार्‍या व्यापार्‍यांना चाप बसणार आहे. त्याचबरोबर खर्‍या कोल्हापुरी गुळाचा नावलौकीक जगापर्यंत पोहचण्यास मदत होईल. कोल्हापुरी चप्पलाला पेंटट मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही कोल्हापुरीच चप्पलाचं पेंटट कोल्हापूरकरांना मिळालेलं नाही. पण आता कोल्हापुरी गुळाचं जिओग्राफीकल इंडिकेशन लवकरात लवकर मिळेल का हे पहावं लागणार आहे.

close