मुंबईत वांद्रे इथं भीषण आग

March 4, 2011 4:48 PM0 commentsViews: 5

04 मार्च

मुंबईत वांद्रे स्टेशनला लागून असलेल्या बेहरामपाड्यात झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होतेय. या आगीच्या ज्वाळा थेट स्कायवॉकपर्यंत पोचल्या होत्या. या आगीत नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 2 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. जखमींना बांद्र्याच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र या आगीत बेहारामपाड्यातील अनेक झोपडपट्‌ट्या जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे काहीकाळ हार्बर लाईनची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम ही झाला होता.

close