म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीची जाहिरात लांबणीवर

March 4, 2011 5:06 PM0 commentsViews: 11

04 मार्च

म्हाडाच्या स्वस्त घरांच्या माध्यमातून मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. पण या महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी अपेक्षित असलेली लॉटरीची जाहिरात लांबणीवर पडली आहे. म्हाडा यावर्षी चार हजार चौतीस घरांसाठी अर्ज मार्ग मागवणार आहे. लॉॅटरीसाठी उपलब्ध असणार्‍या घरांपैकी फक्त नऊशे घरं बांधुन तयार आहेत. उर्वरीत घरं लॉटरीच्या निकालापर्यंत बांधुन तयार होतील का ? तसेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार्‍या घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणार्‍या नसल्यामुळे या जाहिरातीबाबत म्हाडा पुन्हा नव्याने विचार करत आहे. यासर्व घोळामुळे ही ऑनलाईन लॉटरी आता लांबली आहे. पण मग ही जाहिरात नेमकी कधी येणार हे खुद्द गृहनिर्माण राज्यमंत्रीही सांगू शकलेले नाहीत.

close