पुण्यातील हिरानंदानी प्रकल्पावर जाण्यास कोर्टाची मनाई

March 4, 2011 2:04 PM0 commentsViews: 4

04 मार्च

पुण्यात वडगाव मावळ परिसरातील हिरानंदानी गॅस विद्युत प्रकल्पाचं काम ठप्प झालं आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रकल्पाचा विकास करायला किंवा तिथं कुणीही जाण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. तसेच याप्रकरणी केंद्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घेणं आवश्यक असताना या प्रकल्पाला राज्य सरकारने कशी परवानगी दिली याचं स्पष्टीकरणही कोर्टाने या अधिकार्‍यांकडे मागितलं आहे. आणि राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याच्या 8 अधिकार्‍यांना समन्स बजावली आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ कोर्टानं हे आदेश दिले आहे. हा प्रकल्प उभारताना पर्यावरण कायद्यंाच्या नियमांचे पालन न केल्याची याचिका ग्रामस्थंानी कोर्टात दाखल केली होती.

close