ललित मोदींचं पासपोर्ट रद्द

March 4, 2011 5:41 PM0 commentsViews: 3

04 मार्च

आयपीएलमध्ये अब्जोवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणारे ललित मोदी अडचणीत आले आहेत. मोदींचं पासपोर्ट रद्द करण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या शिफारशीनंतर केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ललित मोदी यांना भारतात चौकशीसाठी आणणं सोपं जाणार आहे. मोदी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यांच्याविरुध्द सुरू असलेल्या चौकशीला ते सहकार्य करीत नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे मोदी यांना आता इंग्लंड सोडून इतर देशात जाता येणार नाही. यापूर्वी गँगस्टार अबू सालेम याचाही पासपोर्ट केंद्रानं रद्द केला होता. या निर्णयाविरुध्द मोदी ब्रिटनमधील न्यायालयात दाद मागू शकतील.

close