महिंद्रा अ ॅण्ड महिंद्राच्या कामगारांचे उपोषण सुरूच

March 5, 2011 9:27 AM0 commentsViews: 4

05 मार्च

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीतल्या कामगारांचं उपोषण पाच दिवसानंतरही कायम आहे. जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्तांनी बोलवलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. 94 पासून कामावर असलेल्या 1226 कामगारांना जुन्या कामगारांप्रमाणे वेतन मिळावे ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांसोबत त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झालेत. दरम्यान, सध्याचं वेतन 2009 च्या करारानुसारच असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

close