नंदुरबारची मिर्ची थेट लंडनला निर्यात

March 5, 2011 11:32 AM0 commentsViews: 7

05 मार्चनंदुरबारची मिर्ची थेट लंडन मार्केटसाठी निर्यात होत आहे. इथल्या सेंद्रीय मिर्चीला इग्लंडमध्ये मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे शेतकरी या मिर्चची थेट निर्यात करत असल्यानं त्यांच्या नफ्यातही वाढ झाली. सिद्धीविनायक सेंद्रीय शेतमाल उत्पादक व उद्योग सहकारी संस्थेच्या वतीनं 52 शेतकरी त्यांची सेंद्रीय मिर्ची लंडनला पाठवत आहेत. आतापर्यंत 250 टन माल त्यासाठी तयार केला जात आहे. एक्सपोर्ट क्वालिटीच्या या सेंद्रीय मिर्चीसाठी या शेतकर्‍यांनी स्वतंत्र रोपवाटिका तयार केली होती. आता त्याच्या मार्केटींगचं कामही ते पाहात आहेत. यात शेतकर्‍यांचा वाहतूक खर्च वाचतोय आणि मजुरांना मजुरीही जास्त मिळतेय.

close