जैतापूर प्रश्नी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र लढण्याचे आठवले यांचे संकेत

March 5, 2011 2:14 PM0 commentsViews: 9

05 मार्च

जैतापूरच्या लढ्याला शिवसेनेचाही पाठिंबा असल्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती या लढ्यात एकत्र येऊ शकतात असे संकेत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिले. रामदास आठवले यांनी रत्नागिरी कारागृहात जैतापूर लढ्याचे आंदोलक डॉ. मिलिंद देसाई यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. आरपीआय च्या वतीने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात रत्नागिरीत धरणं आंदोलन होत असून स्थानिकांचा तीव्र विरोध असणारा हा प्रकल्प सरकारने नियोजित जागेवरून हलवावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. स्थानिकांच्या या आंदोलनात आता आरपीआयही रस्त्यावर उतरेल असही आठवले म्हणाले आहे. त्यामुळे जैतापूर प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होत चालला आहे.

close