जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही -मुख्यमंत्री

March 5, 2011 3:46 PM0 commentsViews: 3

05 मार्च

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही मात्र लोकांना विश्वासात घेवून पुर्नवसन करावं अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. हा प्रकल्प राज्याच्या हिताचा असल्याची भूमिकाही शिवसेनेनं मांडली. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. मुख्यमंत्री वर्धा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जैतापूर अणु उर्जा प्रकल्प राज्याच्या हिताचा असल्याचही शिवसेनेनं म्हटल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

close