बेहरामपाड्यात कुटुंबीयांना 25 हजारांची भरपाई

March 6, 2011 9:38 AM0 commentsViews: 3

06 मार्च

मुख्यमंत्री मदत निधीमधून बेहरामपाड्यातील बाधित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यानी बेहरामपाड्यातील आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. आग लागली ती जागा कुणाची याची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यात मुख्य सचिव, संबंधीत अधिकारी आणि रेल्वे अधिकार्‍यांचा समावेश असेल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

close