जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना जिल्हाबंदीचे आदेश

March 6, 2011 9:47 AM0 commentsViews: 3

06 मार्च

मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यानंतर आंदोलनकर्त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी रत्नागिरी पोलीस आणि प्रशासनानं जोरदार मोहीम सुरु केली. प्रकल्पग्रस्तांच्या अटकेनंतर आता प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील, न्या. पी.बी.सावंत तसेच वैशाली पाटील यांना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली. तसेच रत्नागिरी जनजागरण मंचचे डॉ. विवेक भिडे यांना त्यांच्या मालगुंड या गावातच स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांना जिल्ह्यात सर्वठिकाणी नाकाबंदी केली. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवृत्त एसीपी अशोक देसाई आणि इतर दोन कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात त्यांची कसून चौकशी करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांना रत्नागिरी शहरात जाऊ न देता त्यांना थेट मुंबईच्या दिशेनं पाठवण्यात आलं. पावस इथं होणार्‍या बैठकीसाठी हे सर्व नेते रत्नागिरीत येणार होते.

दरम्यान, ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यानंतर सुरू झालेल्या आंदोलकांच्या मुस्कटदाबी विरोधात न्यायालयात धाव घेण्याचे प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी ठरवलं असून अशा प्रकारे साधी बैठकही घेण्याचं स्वातंत्र्य पोलीस हिरावून घेत असतील तर यामुळे असंतोष आणखीनच वाढेल असं प्रकल्पग्रस्तांच्या वकिलांचं म्हणणं आहे.

close