भारत-आयर्लंड आमने सामने

March 6, 2011 8:57 AM0 commentsViews: 6

06 मार्च

भारत आणि आयर्लंडची टीम वर्ल्ड कप स्पर्धेत आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही टीम दरम्यान आतापर्यंत केवळ एकच मॅच खेळवली गेली. आणि या मॅचचा निकाल भारताच्या बाजून लागला. 30 जून 2007 ला आयर्लंडमध्येच ही मॅच खेळवण्यात आली होती. आणि पहिली बॅटिंग करणार्‍या आयर्लंडनं 193 रन्स केले होते. तर भारतानं 1 विकेट गमावत 171 रन्स केले आणि मॅच थांबण्यात आली होती. डर्क वर्थ लुईस नियमाच्या आधारावर भारताला विजय घोषित करण्यात आलं होतं.

close