नागपूरमध्ये सेक्स वर्कर्संना गांधी विचारांची शिकवण

March 6, 2011 10:45 AM0 commentsViews: 4

06 मार्च

सेक्स वर्कर्सपर्यंत गांधी तत्त्वज्ञान पोचवण्याचा प्रयत्न नागपूरमध्ये करण्यात येत आहे. नागपूरच्या रेड क्रॉस सोसायटी आणि सहयोग ट्रस्टनं समाजापासून दूर असलेल्या या महिलांसाठी एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गंगा जमुना नावाने असलेल्या वस्तीतील वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनी ही परीक्षा दिली. यात 22 महिलांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना 6 ते 8 महिन्यापासून आठवड्याला शिकवणी वर्गही घेण्यात आले. बापूंचं सत्य, अहिंसा हे तत्वज्ञान समजावं. तसेच या व्यवसायातून बाहेर पडून सन्मानानं जगता यावं, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

close