इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी साकारले अनोखे प्रयोग

March 6, 2011 11:21 AM0 commentsViews: 1

06 मार्च

पेट्रोलचे वाढते दर, पिण्याचं दुषित पाणी या सगळ्यांनाच दररोज भेडसावणार्‍या समस्यांवर सोपी आणि स्वस्त उत्तरं शोधलीत इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी. नाशिकच्या के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कर्मवीर एक्सपो 2011 या प्रदर्शनात देशभरातले 700 विद्यार्थी सहभागी झाले. साध्या पद्धतीनं पेट्रोल वाचवणं, शेवग्याच्या बियांपासून पाणी शुद्ध करणं यासारखे अत्यंत अनोखे प्रयोग यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले. जिल्हातल्या 18 हजारांहून अधिक जणांनी याला भेट दिली.

close