अमरावतीत शेतकर्‍यांचा सामुहिक फुल शेतीचा पॅटर्न

March 6, 2011 11:29 AM0 commentsViews: 98

06 मार्च

अमरावती जिल्ह्यात सामुहिक फुलशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी एक नवा पॅटर्न साकारला आहे. वरूड जवळ वाई गावात 5 एकर जागेत दीड कोटी रूपयांचा हा प्रकल्प साकारल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्यामुळे गाजत असलेल्या विदर्भात आशेचा नवी किरण निर्माण झाली. 18 शेतकर्‍यांनी एकत्र येवून 18 पॉलीहाऊसच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवलं आहे. या पॉलीहाऊसमध्ये गुलाब,जरबेरा आणि कॉरीनेशन ची लागवड करण्यात आली. एका पॉली हाऊसमधून दररोज 700 फुले मिळत असतात. नागपूर,मुंबई, बंगळुरमधल्या बाजारपेठांमध्ये या फुलांना मागणी आहे. या फुलशेतीमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून रोजगारही निर्माण झाला.

close