अणुजा संखेच्या ‘अक्षरतेज’ अंकाचे निखिल वागळे यांच्या हस्ते प्रकाशन

March 6, 2011 11:48 AM0 commentsViews: 13

06 मार्च

जिद्दीचे पंख असतील तर आकाशाला गवसनी घालणं अवघड नसतं असं म्हटलं जातं ते सिद्ध करून दाखवलंय अनुजा संखे हिने. अंध असूनही पत्रकारितेसारखं आव्हान तिनं स्वीकारून मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाची पहिली अंध विद्यार्थी होण्याचा बहुमानही तिनं मिळवला आहे. एवढ्यावरच न थांबता तिनं 'अक्षरतेज' नावाचं वार्षिक अंकही प्रकाशित केला आहे. काल या अंकाचं प्रकाशन आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आलं.

close