रजणीकांतच्या ‘राणा’मध्ये विद्या बालन

March 6, 2011 11:57 AM0 commentsViews: 2

06 मार्च

साऊथचा सुपस्टार रजनीकांत सोबत काम करण्याचं स्वप्न अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचं आहे पण रजनीकांत सोबत काम करण्याचं विद्या बालनचं स्वप्न पुर्ण झालं आहे. त्याचा राणा या अगामी सिनेमात विद्या त्याच्या सोबत दिसणार आहे. तर बॉलीवूडचा बीग हिट दंबंगचा सिक्वेल आता लवकरच येणार आहे.

रजनीकांत बरोबर राणा सिनेमात काम करायला माधुरी दीक्षितनं नकार दिला. पण आता असं म्हणतात त्या भूमिकेसाठी विद्या बालननं होकार दिला आहे. त्यात रजनीचा ट्रिपल रोल आहे. रजनीच्या दोन हिरॉइन्स आहेत दीपिका पदुकोण आणि रेखा. सानू सूद व्हिलनच्या भूमिकेत आहे. एप्रिलपासून सिनेमाचं प्रॉडक्शन सुरू होणार आहे.

तर दूसरीकडे दबंगचा सिक्वल होणार आहे. पण त्याचं दिग्दर्शन काही अभिनव कश्यप करणार नाही. त्याचं आणि निर्माता अरबाझ खान यांच्यात काही वाद झाला आहे. मग लगेच अभिनवनं आपण सिक्वल करणार नसल्याचं सांगितलं. आता दबंग सिक्वलचं दिग्दर्शन करणार खुद्द अरबाझ खान. ऑल द बेस्ट अरबाझ.

close