पृथ्वी फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं सत्यदेव दुबेंनी

November 7, 2008 8:28 AM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभ मुंबईतल्या हॉर्निमल गार्डनमध्ये पृथ्वी फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं. पृथ्वी फेस्टिव्हलचं उद्घाटन सत्यदेव दुबे यांच्या आयुष्यावर उभारलेल्या प्रदर्शनाने झालं. फेस्टिव्हलचं उद्घाटन होण्यापूर्वीच एक मस्त माहोल तयार झाला होता. रंगभूमीवर प्रेम करणारी मंडळी एकत्र जमली होती. यावेळी सत्यदेव दुबे लिखित आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'खुदा के लिये मत देखना' या नाटकाचा प्रयोग झाला. 16 नोव्हेंबरपर्यंत तरी सर्व नाटकवाल्या मंडळीना पृथ्वी फेस्टिव्हलमुळे छान छान नाटकं पहायला मिळणार आहेत.

close