दक्षिणा मागणार्‍या बडव्यांना आयकर विभागाची नोटीस

March 6, 2011 9:11 AM0 commentsViews: 3

06 मार्च

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांकडून दक्षिणा मागणार्‍या बडव्यांना आयकर विभागानं नोटीस बजावली. आयकर विभागाने बडव्यांच्या उत्पन्नाचे विवरण मागितले आहे. त्यामुळे देवाचं पौरो-हित्य करणार्‍या बडव्यांमध्ये खळबळ माजली आहे. एका आयकर अधिकार्‍याकडून बडव्यानं सक्तीनं दक्षिणा मागितली. त्यामुळे हा खोडसाळपणा केल्याचं बडव्यांचं म्हणणं आहे. दरम्यान उत्पन्नाच्या अनुषंगाने बडवे आणि मंदिर समितीचे उत्पन्न वर्षाला कोटींच्या घरात आहे.

close