शेलारवाडी धरणाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं

March 6, 2011 2:12 PM0 commentsViews: 7

06 मार्च

रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेलारवाडी धरणाचं काम आज संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडलं. आधी पुनर्वसन पूर्ण करा आणि नंतरच धरणाची घळभरणी करा अशी मागणी करत शेकडो ग्रामस्थ धरणाच्या जागी गोळ झाले आणि झालेली घळभरणीही त्यांनी उकरायला लावली. 22 कोटीच्या या शेलारवाडी धरणाची क्षमता 90 टीएमसी असून यामुळे खेड तालुक्यातल्या लवेल,गणवाल अणि गुणबे या गावातल्या 317 कुटुंबांच्या पुनर्वसनाचं काम अजूनही अर्धवट आहे. पुनर्वसन वसाहतीत रस्ते, पाणी, वीज शाळा याची सोय आधी झाली नाही तर धरणाचं कम सुरू करू देणार नाही असा इशाराही या ग्रामस्थांनी दिला.

close