वरुण गांधींच्या लग्नाला सोनिया गांधी अनुउपस्थित !

March 6, 2011 2:55 PM0 commentsViews: 2

06 मार्च

गांधी घराण्यात 13 वर्षांनंतर लग्नाची सनई वाजली. मनेका गांधी आणि संजय गांधी यांचा मुलगा वरुण गांधी यामिनी रॉयबरोबर विवाहबद्ध झाला. काशीच्या कामकोटेश्वर मंदिरात ब्रम्ह मुहुर्तावर हा विवाह सोहळा संपन्न झाला. कॅनडामध्ये असताना वरुण गांधी यांची भेट व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असलेल्या यामिनी रॉय यांच्या बरोबर झाली. या विवाह सोहळ्याला अनेक बडे नेते, व्यावसायिक उपस्थित होते. मात्र सोनिया गांधी यांच्या परिवारातील कोणीही या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

close