आदिवासींची जमीनबद्दल सरकारचा घुमजाव

March 6, 2011 3:48 PM0 commentsViews:

06 मार्च

नंदूरबार जिल्हयातल्या नवापूर तालुक्यामधल्या बेडकी गावातल्या 18 आदिवासी शेतकर्‍यांची जवळपास 52 एकर जमीन तपासणी नाक्यांसाठी सरकारनं संपादीत केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. जमीन संपादीत करताना हेक्टरी 6 लाख रूपये भाव देण्याचं कबूल करूनही इथल्या 17 शेतकर्‍यांना हेक्टरी केवळ 1 लाख 10 हजार रूपयेंचा भाव राज्य सरकारनं दिला. मात्र काँग्रेसचे माजी मंत्री स्वरूपसींग नाईक यांचे पूतणे विनोद बाळू नाईक यांना जवळपास 1 एकर जमीनाला मात्र 30 लाख 83 हजार 258 रूपये इतका मोबदला देण्यात आला. ही तफावत राजकीय संबंधातून झाल्याचा आरोप उर्वरीत 17 आदिवासी शेतकरी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या संबंधाची तक्रार त्यांनी राज्याचे लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोगाकडेही केली.

close