जुन्नर येथे सापडली 46 सोन्याची नाणी

March 6, 2011 3:52 PM0 commentsViews: 52

06 मार्च

पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथल्या राजगुरुनगरमध्ये एका जुन्या घराचं खोदकाम करताना बाराव्या शतकातील 480 ग्रॅम वजनाची 46 सोन्याची नाणी सापडली. या मुघलकालीन नाण्यांची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे. राजगुरुनगर इथं ब्राम्हण आळीमध्ये गणेश महादेव खेडकर यांच्या वाड्याचे काम सुरु होतं. त्यावेळी ही नाणी सापडली. ही नाणी अकराशे अडुसष्ठच्या काळात असून अरबी आणि फारसी भाषेत मजकूर छापला आहे. या नाण्यांवर बादशाह अलंगीर शहाजहान यांची नाव आहेत. दरम्यान तहसीलदारांनी या नाण्यांचा पंचनामा करुन ती महसूल विभागाच्या ताब्यात दिली.

close