हरभजन सिंगनं 300 विकेट्सचा टप्पा पार केला

November 7, 2008 9:40 AM0 commentsViews: 2

07 नोव्हेंबर नागपूर,हरभजन सिंगनं टेस्ट करिअरमध्ये 300 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान रिकी पॉण्टिंगला बोल्डकरून त्याने 300वा बळी मिळवला. टेस्ट करिअरमध्ये हरभजननं तब्बल दहा वेळा पॉण्टिंगची विकेट घेतली आहे. बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीमध्ये हरभजन सिंगची कामगिरी विशेष उल्लेखनीय झाली आहे. मोहाली टेस्टच्या दुस-या इनिंगमध्ये त्याच्या जादूई स्पीनसमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर अक्षरश: कोसळली होती. हरभजनने 72 टेस्ट मॅचमध्ये 300 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा अ‍ॅव्हरेज 31.17 इतका आहे. 84 रन्स देत 8 विकेट ही त्याची करिअरमधली सर्वोत्तम कामगिरी आहे.

close