थॉमस यांच्या नेमणुकीची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली

March 7, 2011 8:34 AM0 commentsViews: 3

07 मार्चमुख्य दक्षता आयुक्त पी.जे थॉमस यांच्या नेमणुकीची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली आहे. त्याबाबत आज मनमोहन सिंग यांनी संसदेत निवेदन केलं.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदर करतो आणि आपला निर्णय चुकीचा होता. त्याची जबाबदारी स्विकारतो असं निवेदन पतंप्रधांनानी लोकसभेत केलं. मुख्य दक्षता आयुक्त पी.जे थॉमस यांची नेमणूक सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवली. त्यावर पंतप्रधांनानी आज लोकसभेत निवदेन केलं.दरम्यान विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांच्या निवेदनावर टीका केली. जम्मू काश्मीरमधील पंतप्रधानांचं विधान आणि आताच्या निवेदनामध्ये बरच अंतर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close