काँग्रेस-द्रमुक मधील तिढा सुटण्याची शक्यता

March 7, 2011 8:25 AM0 commentsViews: 2

07 मार्च

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेस आणि द्रमुकमध्ये निर्माण झालेला वाद संपण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस-द्रमुकमधील तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या महत्वांच्या नेत्यांची बैठक सध्या दिल्लीत सुरू आहे. अहमद पटेल, प्रणव मुखर्जी, गुलामनबी आझाद आणि दयानिधी मारन हे या बैठकीला उपस्थित आहेत. द्रमुकने आपल्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. तरी या वादावर काँग्रेसने घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलं होतं. त्यानुसार द्रमुकशी बोलणी सुरू ठेवली आहेत. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत या वादावर तोडगा निघण्याची शक्याता आहे.

close