रोहिदास पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

March 7, 2011 9:40 AM0 commentsViews: 5

07 मार्च

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याविरोधात देवपूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे 40 लाख रुपये बेकायदेशीरपणे जवाहर रोटो सूतगिरणीला दिल्याचा आरोप रोहिदास पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. धुळ्यातल्या देवपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिदास पाटील यांचा मुलगा कुणाल या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. 1992 मध्ये या संस्थेतून सूतगिरणीला 40 लाख रुपये द्यावेत अशा लेखी सूचना रोहिदास पाटलांनी केल्याचं तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे. तर हा व्यवहार चेकद्वारे आणि अधिकृतपणे झाल्याचं पाटील यांचं म्हणणं आहे.

close