ठाण्यात प्रबोधनकार ठाकरे हाऊसला महापालिकेने सील ठोकले

March 7, 2011 11:01 AM0 commentsViews: 5

07 मार्च

ठाणे महानगरपालिकेनं जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या जमिनीवर बांधण्यात आलेला प्रबोधनकार ठाकरे क्लब हाऊसला सील ठोकले आहे. 1 कोटी 2 लाख रुपयांचा मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी महापालिकेनं ही कारवाई केली. ठाणे महानगरपालिकेनं जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या जमिनीवर बांधण्यात आलेला प्रबोधनकार ठाकरे क्लब हाऊस सील केले. 1 कोटी 2 लाख रुपयांचा मालमत्ता कर बुडवल्या प्रकरणी महापालिकेनं ही कारवाई केली. 2007 साली या प्रकरणी 28 लाखांची थकबाकी होती. 2008 ते 2010 या कालावधीतही 92 लाखांचा टॅक्स थकीत होता.

वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट रविंद्र आंग्रे आणि महेश वाघ हे दोघं प्रबोधनकार ठाकरे क्लब हाऊसचे पार्टनर होते. त्यांच्यात एका प्रोजेक्टवरुन भांडणं झालं. त्यांच्या या वादात आंग्रे यांना जेलमध्ये जावं लागले. या वादाचा परिणाम प्रबोधनकार ठाकरे क्लब हाऊस प्रकरणावर झाला.

close