पुण्यात रंगला मराठी विरूध्द बॉलीवूड कलावंताचा फूटबॉल सामना

March 7, 2011 8:01 AM0 commentsViews: 6

07 मार्च

पुण्यात अभिजीत कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीनं काल बॉलीवूड फूटबॉल मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्याच्या टीममध्ये संगीतकार अजय-अतुल, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, विश्वजीत कदम, धनराज पिल्ले हे खेळाडू होते तर बॉलीवूड टीममध्ये सलमान-सोहले खान, हर्मन बवेजा, महेश मांजरेकर या बॉलीवूड बडीजचा समावेश होता. या मॅचमधून जमा होणारा निधी सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. बॉलिवूड टीमनं ही मॅच सात विरुद्ध दोन गोलनं जिंकली.

close