जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम – बाळासाहेब ठाकरे

March 7, 2011 11:15 AM0 commentsViews: 32

07 मार्च

जैतापुरच्या प्रश्नावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक मातोश्रीवर घेतली. यावेळी 1 तास बाळासाहेबांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. येणार्‍या विधानसभा अधिवेशनात सेना हा विषय सभागृहात उपस्थित करणार आहे. येत्या अधिवेशन काळात सर्व शिवसेना आमदार आणि खासदारांसोबत स्वत: उद्धव ठाकरे जैतापूरचा दौरा करणार आहेत. याबाबत बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी जैतापूरला शिवसेनेचा विरोध कायम राहिलं हे स्पष्ट केलं. जैतापूरला जाण्यापासून आपल्याला कोण रोखतो ते पाहूयात असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या भूमिकेबदद्लही बाळासाहेबांनी नाराजी व्यक्त केली आणि काल गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरी भाषेत समाचारही घेतला. पुण्यात एक आणि पुण्याबाहेर युती कायम राहील असं समजण्याची चूक भाजपने करु नये हेही त्यांनी स्पष्ट केलं.

close