जैतापूर प्रकल्प विरोधातील आंदोलकांच्या तडीपारीवर सुनावणी

March 7, 2011 10:37 AM0 commentsViews: 4

07 मार्च

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सात जणांच्या तडीपारीच्या प्रस्तावावर आज रत्नागिरी प्रांताधिकार्‍यांकडे सुनावणी होत आहे. या सातही जणांनी प्रांताधिकार्‍यांची भेट घेतली असता कोणत्याही दोन जणांची तडीपारीसाठी नावं द्या असं त्यांना सांगण्यात आलं आहे. मात्र तडीपार करायची झाल्यास सातही जणांना तडीपार करा असा आग्रह या आंदोलकांनी धरला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सुनावणीवर अंतिम निर्णय होणार आहे. जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी असलेल्या माडबनचे सरपंच आणि जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांच्यासह सात जणांवर रत्नागिरी पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना तीन जिल्ह्यातून तडीपार कर्ण्याचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे सादर केला होता. त्यावर ही आज सुनावणी होत आहे.

close