गोंदियात दोन गटात झालेल्या वादातून एकाची हत्या

March 7, 2011 11:13 AM0 commentsViews: 1

07 मार्च

गोंदिया शहरात दोन गटात झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली तर दुसर्‍याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्यवर्ती बस स्थानकाजवळच्या मरारटोळी परीसरात तणाव निर्माण झाला होता. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी झालेल्या तणावामुळे पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. मरारटोळी भागात राजू पटले याच्या घराचा गेल्या 10 वर्षापासून भाडेकरुनं अवैधरित्या ताबा घेतला होता.

घर खाली करुन देण्यासाठी काही भाडोत्री गुंड या परिसरात आले होते. मात्र या वादात शेजारी राहत असलेले बारमालक राम चौधरी यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे चिडून जाऊन 40 ते 50 जणांच्या जमावाने तलवारी आणि चॉपरच्या सहाय्याने राम चौधरी यांच्या घरावर हल्ला केला. यात राम चौधरी जागीच ठार झाले. तर इतर दोन जखमींवर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेत आहे.

close