राज ठाकरेंवरील सुनावणी आता 18 नोव्हेंबरला

November 7, 2008 10:16 AM0 commentsViews: 2

7 नोव्हेंबर, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन रद्द करण्यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या याचिकेची सुनावणी आता 18 नोव्हेंबरला होणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक झाली होती. विक्रोळी कोर्टाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. यावेळी घातलेल्या अटींची राज ठाकरे पायमल्ली करत असून त्यांना दिलेला जामीन रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची याचिका राज्य सरकारने विक्रोळी कोर्टात दाखल केली होती. त्याची सुनावणी विक्रोळी कोर्टात झाली. याप्रकरणी राज ठाकरे न्यायालयात उपस्थित राहणं गरजेचं असल्याचं सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी सांगितलं. दरम्यान, मेट्रोपोलिटन मेजिस्ट्रेट यांनी सुनावणी 10 दिवसांकरता पुढे ढकलली असल्याचा निर्णय दिला.

close