हसन अली अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात

March 7, 2011 11:40 AM0 commentsViews: 3

07 मार्चपरदेशात काळा पैसा दडवल्याचा आणि कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याचा आरोप असलेला घोडे व्यापारी हसन अली अखेर सापडला आहे. त्याला अंमलबजावणी संचालनालयाने पुण्यातून ताब्यात घेतलं आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी हसन अलीच्या पुण्यातील घरावर छापा टाकला. त्यानंतर दिवसभर झालेल्या चौकशीनंतर हसन अलीला ताब्यात घेण्यात आलं. अनधिकृत हवाला व्यवहार ते घोड्यांचा व्यापार, आणि बनावट पासपोर्टस् ते करोडो रुपयांची टॅक्सचोरी असे कारनामे असलेला हा पुण्यातला बिझनेस टायकून हसन अली कायद्याच्या कचाट्यात अडकला 2008 साली. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हसन अलीनं 36 हजार कोटींची अवैध मालमत्ता जमवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याच मालमत्तेवरचा कर बुडवल्याबद्दल इन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं ही नोटीस बजावली होती. आणि आता हसन अलीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

close