सुभाष देसाईंना पदावरून हटवण्याची शक्यता

March 7, 2011 1:03 PM0 commentsViews: 27

07 मार्च

शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांना पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवले आहे. त्यासाठी नवीन गटनेत्याच्या नावाचा विचार शिवसेनेनं सुरू केला आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आहेत. तसेच बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांपैकी देसाई मानले जात असल्यानं हा बदल करायचा झाल्यास बाळासाहेबांचं मत काय आहे याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अधिवेशनात आक्रमक होत असताना शिवसेनेचे आमदार कुठे तरी कमी पडत असल्याने नेतृत्व बदल केलं जाण्याची चर्चा आहे. आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे सुभाष देसाई स्वत: या पदावरुन हटण्यास तयार असल्याचंही बोलले जात आहे.

close