कोल्हापूरमध्ये 75 कोटींचा यु.एल.सी घोटाळा !

March 7, 2011 2:58 PM0 commentsViews: 5

07 मार्च

कोल्हापूरमध्ये 75 कोटी रुपयांचा यु.एल.सी घोटाळा उघडकीस आला. माहितीच्या अधिकाराखाली प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेनं ही बाब उघडकीला आणली. आदिनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेला यु.एल.सीचा भुखंड देण्याला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंजुरी दिली होती असं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सांगितले.

या गृहनिर्माण संस्थेमध्ये एकूण 123 सभासद आहेत. त्यातील जवळ जवळ सगळे सभासद हे धनदाडंगे असून ह्या गृहनिर्माण संस्थेत एकाच परिवारातील चार ते पाच जण सभासद आहेत. सध्या यु.एल.सीच्या भुखंडावर बांधलेल्या बांधकामाचे एन.ए झालेलं नाही. शेतजमिनीचा शेतसारा भरलेला नाही आणि इनामही रद्द केलेली नाही. एवढचं नव्हे तर या गृहनिर्माण संस्थेनं ही जागा राहण्यासाठी वापरणं आवश्यक असतांना त्या गृहनिर्माण सोसायटीत कमर्शियल गाळे बांधायला कोल्हापूरच्या आयुक्तांनी परवानगी दिली कशी असा प्रश्नही दिलीप देसाई यांनी उपस्थित केला. यामध्येअनेक अधिकारी अडकले असून या घोटळ्याचा तापास सी.बी.आयव्दारे व्हावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष देसाई यांनी केली.

close