सुधारित लोकपाल विधेयक लवकरच अण्णांना पंतप्रधानचं आश्वासन

March 7, 2011 5:48 PM0 commentsViews: 1

07 मार्च

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आता थेट दिल्लीत नेला. आज संध्याकाळी पंतप्रधानांना भेटून त्यांनी लोकपाल विधेयकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही बदल सुचवले. लोकपाल विधेयकाची सुधारीत कडक आवृत्ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्यानंतर अण्णांनी आपलं 5 एप्रिलपासून सुरू होणारे नियोजित उपोषण मागे घेण्याचे संकेत दिले आहे. या बैठकीत अण्णांसोबत किरण बेदी, स्वामी अग्निवेश होते. तर सरकारच्या बाजूनं पंतप्रधानांसोबत कायदामंत्री वीरप्पा मोईली आणि संसदीय कामकाजमंत्री पवन बंसल उपस्थित होते. लोकपाल विधेयक भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात येतं आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकलेलं नाही.

close