नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले

March 8, 2011 10:15 AM0 commentsViews: 12

08 मार्च

नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहे. लालसगाव बाजार समितीत कांदा सव्वा रुपये किलोवर गडगडला. मनमाडमध्ये 2 रुपये किलो, पिंपळगावमध्ये सव्वा तीन रुपये किलो असा दर आहे. आवक जास्त झाल्याने हे भाव पडल्याचे बोललं जातं आहे. तर दुसरीकडे 470 डॉलर हे प्रति टन निर्यात दर 250 डॉलर प्रति टनपर्यंत खाली आणावे अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

close