नाशिक-पुणे रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार

March 8, 2011 8:21 AM0 commentsViews: 2

08 मार्च

नाशिक-पुणे रस्त्यावर पळशाजवळ काल रात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात राहत्याचा सराईत गुंड पाप्या शेख उर्फ सलीम ख्वाजा हा जखमी झाला आहे. शेख कल्याणकडून शिर्डीला परतत होता. नाशिक ओलांडल्यावर त्याच्या गाडीवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात पाप्यासह विनोद जाधव गंभीर जखमी झाला तर 7 वर्षांचा गणेश जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्यारांची तस्करी करणार्‍या टोळीने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झालं त्यांची माहिती पाप्या शेखने पोलिसांना दिल्याने त्यांनी हा हल्ला केला. यामध्ये भूषण मोरे, नितीन शेजवळ आणि प्रदीप सरोदय या शिर्डीतल्या तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

close