शिवसेनेची आपल्या मुखपत्रातून भाजपवर टीका

March 8, 2011 11:11 AM0 commentsViews: 2

08 मार्च

पुणे पॅटर्नवरुन शिवसेनेनं भाजपवर जोरदार टिका केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही टीका करण्यात आली. ''मित्रांनो खांदा द्यायची वेळ आणू नका'' या सदराखाली हे संपादकीय लिहीण्यात आलं आहे. प्रांतीय पक्षाच्या जोरावर सत्ता भोगायची आणि त्यांच्यासोबत दगाफटका करायचा हा राष्ट्रीय पक्षांचा नेहमीचा उद्योग आहे या शब्दात भाजपला फटकारलं आहे. मनसे, राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही असं म्हणणार्‍या भाजप अखेर राष्ट्रवादी आणि मनसेसोबत पाट लावतो. राष्ट्रवादीचे हात भाजप कार्यकर्त्याच्या खुनाने रंगले आहेत. पिंपरी चिंचवडचे भाजप अध्यक्ष अंकुश लांडगे यांची राष्ट्रवादीवाल्यानी दगडानं ठेचून हत्या केली तर भाजप पदाधिकारी शशिकांत शितोळे यांचे हात पाय तोडले. रक्त सुकले नसतांनाही शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भाजपनं स्विकारले. सत्ता आणि पदासाठी ज्यांना स्वकीयांच्या रक्ताचीही कदर नाही ते 22 वर्षाच्या मैत्रीचा काय आदर करणार असा सवालही या लेखात करण्यात आला. राज्या राज्यातील मित्रांच्या तंगडी घालून पाडण्याचा हाच अजेंडा राष्ट्रीय पक्षाचा असतो. काँग्रेसनेही द्रमुकच्या बाबतीत हेच केल अशी आठवणही सामना मधून देण्यात आली.

close