पुण्यात फुलपाखरू उद्यानाचं थाटात उद्घाटन

March 8, 2011 11:16 AM0 commentsViews: 10

08 मार्च

सुंदर म्युझिक, हिरवळ आणि आजुबाजुला हजारो फुलपाखरं. असं वातावरण अनुभवण्याची संधी आता पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातल्या सहकारनगर मधल्या फुलपाखरु उद्यानाचं उद्घाटन आज अभिनेत्री डिंपल कपाडीयाच्या हस्ते झाले. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. डिंपल कपाडीया यांना यावेळी खास बॉबी चित्रपटाची रेकॉर्ड गिफ्ट करण्यात आली. फुलपाखरु जन्मण्यासाठी आवश्यक असणारे पोशक वातावरण या उद्यानात उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या उद्यानाची आणि फुलपाखरांची खास काळजी घेतली जावी अशी भावना यावेळी डिंपल कपाडीया यांनी व्यक्त केली.

close