तेलगीनं भरला 6.5 कोटी इन्कम टॅक्स

November 7, 2008 10:27 AM0 commentsViews: 4

7 नोव्हेंबर, बेळगाव प्रताप नाईक अब्जावधी रुपयांचा स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आहे. पण जेलमध्ये असणार्‍या तेलगीनं यावर्षी 6.5 कोटी इन्कॅम टॅक्स भरला आहे. हा इन्कॅम टॅक्स इनफोसिसचे सीईओ नंदन निलकेनी आणि विप्रोचे अजीम प्रेमजी यांच्यापेक्षा जास्त आहे. बनावट स्टॅम्प घोटाळा करून तेलगीनं सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवला. पण विशेष म्हणजे सगळ्यात प्रामाणिक करदात्यांच्या लिस्टमध्ये त्याचं नाव येतंय. तेलगी स्टॅम्प घोटाळा उघडकीस आणायला मदत करणार्‍या जयंत तिनईकर यांनी ही गोष्ट धक्कादायक असल्याचं म्हटलंय.' तेलगीला अटक करायच्या आधीच्या पाच वर्षांमध्ये 700 रुपये सरसकट महसूल गोळा करणारा कर्नाटक राज्य आज किमान 1800 कोटी रुपयांचा महसूल गोळा करतंय. केवळ एका राज्याची गळती रोखण्यात आम्ही यशस्वी झालो. इतर राज्यामध्ये तेलगीचा धंदा बिनबोभाट सुरुच आहे. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे तेलगी जेलमध्ये राहून भरत असलेला इन्कॅम टॅक्स, हेच याचं ज्वलंत उदाहरण आहे ', असं जयंत तिनईकर सांगत होते.तेलगीनं जेलमध्ये राहून इतका पैसा कुठून आला, हा प्रश्न कोड्यात टाकणार आहे. तेलगीनं नेमका किती कोटींचा घोटाळा केला, हे शोधून काढायला सरकारला अजूनही यश आलेलं नाहीय, हे दुर्देव असल्याचं तिनईकराचं मत आहे.

close