स्त्री भ्रूणहत्येबद्दल संदेश देणाचा गाण्यातून प्रयत्न

March 8, 2011 12:51 PM0 commentsViews: 34

माधुरी निकुंभ, मुंबई

08 मार्च

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत हिंदी सिनेमाचे संगीतकार राहुल सेठ यानी स्त्री भ्रूण हत्येवर बेतलेलं एक गाणं तयार केलं आहे. त्याची निर्मिती केली कांचन अधिकारी यांनी. या गाण्यातून एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

एका कोवळ्या जीवाला जन्म देण्याचं वरदान फक्त आणि फक्त स्त्रीला मिळाले. पण स्त्री भ्रुण हत्येसारख्या समस्येनं हे वरदान या जगात येऊ इच्छिणार्‍या अनेक मुलींसाठी मात्र शाप बनलं. याच समाजाचा एक संवेदनशील घटक म्हणून गायक संगीतकार राहुल सेठने एक गाणं तयार केलं.

आपल्या गाण्यातून सामाजिक प्रबोधन होईल किंवा नाही यापेक्षा हा विचार जरी काही क्षणासाठी आपण या समाजात रुजवू शकलो तरी पुरेसं असल्याचं राहूलला वाटतं. या विश्वासानंच खरंतर हे गाणं त्यानं खास जागतिक महिला दिनानिमित्त रिलीज केलं आहे. विशेष म्हणजे राहुलच्या या कामात त्याला साथ एका महिला निर्मातीची मिळाली.

समाजातल्या प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळत स्त्रीभ्रुण हत्येचा निषेध केला तर जन्मापूर्वीच या मुलींना संपवण्याऐवजी त्यांच्या जन्मानंतर त्या नवं जग उभं करु शकतात. राहुलच्या गाण्यातून मिळणारा हा संदेश हा समाजातल्या अनेकांसाठी मार्गदर्शक ठरो हीच भावना.

close