श्रमिक महिलांचे कष्ट संपेना !

March 8, 2011 9:16 AM0 commentsViews: 11

दीप्ती राऊत, नाशिक

08 मार्च

श्रमिक, कष्टकरी महिला आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या तो दिवस म्हणजे 8 मार्च. यंदा या जागतिक महिला दिनाला 100 वर्ष पूर्ण होताहेत. पण श्रमिक, कष्टकरी महिलांचे कष्ट मात्र संपले नाहीत. महिला घराबाहेर पडत नाहीत हा आजच्या पिढीचा प्रश्न नाही. आजच्या पिढीचा मुद्दा आहे तो घराबाहेर पडणार्‍या महिलांचा आणि त्यांच्या प्रश्नांचा…

एमआर भावना चव्हाण म्हणता की, बर्‍याचवेळा कंपन्या मातृत्वाचा हक्क नाकारतात. जेव्हा त्यांना कळतं एखादी लेडी एमआर प्रेग्नंट आहे तेव्हा ती नोकरी कशी सोडेल हे बघतात. तर एमआर शिरीन बिसेन म्हणते की, आम्हाला कामानिमित्तानं बाहेरच्या टूरर्स असतात. रात्री राहाण्याची सोय कंपनीनं हॉटेलमध्ये केलेली असते. ती हॉटेल्स सुरक्षित वाटत नाहीत. सिन्सिअर म्हणून लेडी एमआरची निवड करतात पण प्रेग्नसीसारखे मुद्दे आल्यावर सगळ्याच कंपन्या तिला काढून कसं टाकता येईल याच्या मागेल लागतात असं निला रानडे यांचं म्हणणं आहे.

मात्र वकीर्ंग वुमन अर्थात कामकाजी महिलांबाबत दोन बाबी प्रकर्षानं होत असल्याचे जागतिक अभ्यास सांगतो. एकीकडे कौटुंबिक जबाबदार्‍या तिला चार भिंतींच्या आत खेचत असतात आणि दुसरीकडे तिला बाहेरचं वातावरण तिला आत ढकलत असतं. यात सर्वात भरडल्या जाताहेत कंत्राटी महिला कामगार. कंत्राटी कामगार साधना झोपे म्हणतात की, पीएफ कटींग होतो पण फक्त रजिस्टरवर सही घेतात. पीएफ ऑफिसमध्ये चौकशी केली तर कळतं काही नाही. आम्हाला 40 जणींमागे फक्त 1 संडास बाथरूम आहे. खूप गैरसोय होते. खूप काम पडतं. एक महिला स्प्रींग लावत होत तेव्हा तिच्या खांद्यावर काँक्रीट पडलं. काही झालं असतं तर कंपनीनं भरून दिलं असतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे आणि यासारखे असंख्य प्रश्न. कुणी एकेकटी झेलतेय, कुणी संघटित होवून सोडवतेय. महिला दिनाच्या खर्‍या मानकरी ठरताहेत. याच कामकाजी महिला..

close