पदवीपर्यंतच्या मुलींना मोफत रेल्वे पास !

March 8, 2011 3:16 PM0 commentsViews: 8

08 मार्च

मुलींचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना रेल्वेकडून मोफत पास योजनेची रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राज्यसभेत घोषणा केली. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विद्याथीर्ंनींना रेल्वेमंत्र्यांनी ही अनोखी भेट दिली. लोकसभेतून रेल्वे बजेटला मंजुरी मिळाल्यानंतर ते आज राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आलं. या चर्चेच्या वेळी काँग्रेसचे खासदार नरेंद्र बुदानिया यांनी विद्यार्थीनींना महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मोफत रेल्वे पास देण्याची सूचना केली. त्याला लागलीच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली.

close