मासिक पाळीच्या रक्तातील स्टेम सेल्सचं होणार बँकिंग !

March 8, 2011 4:32 PM0 commentsViews: 118

उदय जाधव, मुंबई

08 मार्च

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतीय महिलांसाठी एक क्रांतीकारक वरदान घेऊन आलंय. लाईफ सेल या कंपनीने स्टेम सेल बँकिंग आता भारतातही सुरू केली आहे. हे बँकिंग म्हणजे महिलांच्या मासिक पाळीच्या वेळेला जे रक्त शरीरातून बाहेर जातं ते टाकून न देता त्याचं व्यवस्थित जतन केलं जातं. जतन केलेल्या या रक्तात मूळ पेशी मोठ्या प्रमाणात असतात. आणि याच मूळ पेशी, भविष्यात महिलांना त्यांच्या दुर्धर आजारांवर उपचार देण्यासाठी फायदेशीर ठरु शकतील.

मुंबईच्या ताजमहल हॉटेलमध्ये आज लाईफ सेल फेमे या क्रांतीकारी सेवेची सुरवात करण्यात आली. या सेवेचा फायदा सर्व महिला घेऊ शकतात. मासिक पाळीच्या वेळी, शरीरातून जे रक्तं बाहेर पडतं. ते रक्त खराब असतं, असा समज आहे. पण आता हेच रक्त सुरक्षितपणे साठवून ठेवलं तर महिलांच्या भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

स्त्री रोगतज्ञ डॉ. अनिता सोनी म्हणता की, भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे ही सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक महिलेला या सेवेचा फायदा घ्यायचा असेल तर, पहिल्या वर्षी तीस हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर एका वर्षासाठी दीड हजार रुपयांत महिलांना ही सेवा लाईफसेल तर्फे उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांना लाईफ सेल हे एक क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे. ————-

close